अठरावी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा-२०२२

दिव्य जीवन संघ, पुणे शाखा आयोजित

अठरावी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा-२०२२

परिचय-१३ जानेवारी १९३६ रोजी स्थापन झालेली दिव्य जीवन संघ ही   एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वामी शिवानंद सरस्वती यांनी स्थापलेल्या या संस्थेची शिकवणूक सेवा, प्रेम, दान,चित्तशुद्धी,ध्यान ही आहे. योगसमन्वय हा गाभा आहे. स्वामी शिवानंदजी यांच्या निर्वाणानंतर स्वामी चिदानंद सरस्वती हे संस्थेचे अध्यक्ष झाले. २४ सप्टेंबर या स्वामी चिदानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी सदर स्पर्धा होत असते.

स्पर्धेविषयी माहिती : –

दिनांक- २४ सप्टेंबर, २०२२ (शनिवार)   वेळ :- दुपारी १ वा.

स्थळ-  ना. सी. फडके सभागृह, ४२, विजयानगर कॉलोनी, नीलायम चित्रपटगृहाजवळ, सदाशिव पेठ, पुणे३०  

विषय : –

१) वैश्विक मानवी मूल्ये
२) भारतीय ज्ञानपरंपरा
३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्त्रियांचे देशाच्या विकासाला योगदान!
४) विकास की पर्यावरण
५) सर्वभूतहिते रता:
६) “येत्या काळात शतक गाठणाऱ्या “दिव्य जीवन संघाकडून “अपेक्षा ”      
(विशेष पुरस्कारासाठी)

पारितोषिके

  • कै दादा देशपांडे स्मृती-प्रथम पुरस्कार- रु २५००/-
  • कै ताई देशपांडे स्मृती-द्वितीय पुरस्कार-रु २०००/-
  • कै सुमन गांगल स्मृती- तृतीय पुरस्कार- रु १५००/-
  • उत्तेजनार्थ –             प्रथम पुरस्कार-   रु.५००/-
  • उत्तेजनार्थ-            द्वितीय पुरस्कार- रु. २५०/-

येत्या काळात शतक गाठणाऱ्या दिव्य जीवन संघाकडून अपेक्षा ” या विषयावरील सर्वोत्कृष्ट भाषणास परीक्षकांनी शिफारस केल्यासच रु २५००/- चा विशेष पुरस्कार दिला जाईल अन्यथा नाही.

नियम :

१)प्रत्येक स्पर्धकास १० मिनीटे वेळ दिला जाईल.
२)प्रवेश पत्रिका दि.२० सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयाच्या लेटर हेड वर प्राचार्यांच्या सहीशिक्क्या अठरावी राज्यस्तरीय आन्तरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, “ ईशावास्य” ४९/सायंतारा कॉलनी, डी. एस. के. विश्व, धायरी, पुणे-४११०४१, भ्रमणध्वनी- ९८५०९३१४१७(किंवा soft कॉपी deshpandenh@gmail.com या मेल आयडी वर पाठवावी).
३) स्पर्धेसाठी प्रवेशमूल्य नाही.
४) स्पर्धकांनी स्वतःची सर्व व्यवस्था स्वतः करणे अभिप्रेत आहे.
५) ११वी ते पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा खुली आहे.
६) स्पर्धा मराठीतून असली तरी हिंदी अगर इंग्रजीतून विषय मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचेही स्वागत केले जाईल.
७)परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. तसेच स्पर्धेविषयी सर्वसाधारण मतप्रदर्शन परीक्षक जरूर करतील परंतू स्पर्धेचा निर्णय कोणासही दाखविला जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे सर्व नियम मान्य असतील,अशाच विद्यार्थ्यांची नावे महाविद्यालयांनी कळवावीत.

विशेष सूचना- दिव्य जीवन संघाची सर्व माहिती www.dlshq.org या संकेत स्थळावर व त्याच्याशी संबंधित लिंक्स वर उपलब्ध आहे.